breaking-newsमहाराष्ट्र

दुष्काळी भागातील दौ-यात सत्कार स्वीकारणार नाही, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

पुणे – राज्यातील काही भागात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. दरम्यान, बारामती आणि दौंड तालुक्यात सुरु असलेल्या दुष्काळ दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काही विशेष सुचना दिल्या. या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून होणारा सत्कार आपण स्विकारणार नाही, अशी भुमिका त्यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा एकत्रित बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरु आहे. या दौऱ्यात शरद पवार आणि अजित पवार यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेटी दिल्या. खैरेपडळ गावापासून त्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी दुष्काळी गावातील चारा छावण्यांना भेटी दिल्या तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बारामती तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. दरम्यान, ७ जून रोजी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांच्याशी दुष्काळावरील उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.

दुष्काळ दौऱ्यात पवारांनी माळेगाव, सुपा, मोरगाव, लोणी, उंडवडी मंडळ याठिकाणी चारा छावण्यांना त्यांनी भेटी दिल्या. दुष्काळनिवारणासाठी मोटारी, टँकर फेऱ्या वाढवणे, शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या, पावसाच्या आगमनानंतरही पुढचे २-३ महिने चारा छावण्या सुरू ठेवणे, वीज पुरवठ्याचा सुनियोजीत वापर, सुप्याच्या तलावातल्या पाण्याचे नियोजन इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भर दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button