breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

ब्लॅक आणि व्हाईट फंगसनंतर आता यलो फंगसचा धोका, उत्तर प्रदेशात आढळला पहिला रुग्ण

लखनऊ – देशात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत नसताना आता फंगसचं संकट उभं ठाकलं आहे. कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगसचा धोका कायम असताना व्हाईट फंगसचाही आजार उद्भवू लागला. व्हाईट फंगसनंतर आता यलो फंगसंचही संकट ओढावलं आहे. उत्तर प्रदेशातील गझियाबादमध्ये यलो फंगसचा पहिला रुग्ण आढळला आहे. 45 वर्षांच्या व्यक्तीला यलो फंगसचा संसर्ग झाला आहे.हा फंगस ब्लॅक आणि व्हाइडपेक्षाही यलो फंगस अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. बीपी त्यागी यांनी सांगितलं, सीटी स्कॅनमध्ये 45 व्यक्तीचं सायनस सामान्य होतं. पण जेव्हा आम्ही एन्डोस्कोपी केली तेव्हा त्याला ब्लॅक, व्हाइट आणि यलो असे तीन प्रकारचे फंगल इन्फेक्शन असल्याचं समजलं.

सामान्यपणे यलो फंगस सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतं. पहिल्यांदाच मला हे माणसांमध्ये दिसून आलं आहे. कोणत्याही जनरलमध्ये याबाबत काही माहिती नाही. हा संसर्ग Amphotericin B ने बरा होऊ शकतो, पण व्हाइट आणि ब्लॅक फंगसच्या तुलनेत यलो फंगसमध्ये जखम बरी होण्यास वेळ लागतो, असंही डॉ. त्यागी यांनी सांगितलं.

लक्षणं काय आहेत?

थकवा किंवा सुस्तपणा, कमी भूक किंवा भूक न लागणे, वजन कमी होणं, जखम बरी होण्यास वेळ लागणं, डोळे आत जाणं ही यलो फंगसची लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसल्याच त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांकडे जा. मिळालेल्या माहितीनुसार अस्वच्छतेमुळेही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता राखा. शिळं किंवा खराब अन्न जास्त काळ ठेवू नका.

येलो फंगस का होतो?
अनहायजीनमुळे येलो फंगस होतो. त्यामुळे घराच्या आसपास स्वच्छता ठेवा. स्वच्छतेमुळे बॅक्टेरिया आणि फंगसच्या उत्पत्ती आणि विकासाला रोखण्यात मदत होते. शिळं अन्न घरात दीर्घकाळ ठेवू नका. शिळं अन्न किंवा खाद्यपदार्थ अधिक काळ ठेवल्यास हा आजार फोफावण्याची शक्यता असते, असं सूत्रांनी सांगितलं.

बचाव कसा कराल?
येलो फंगसच्या वाढीसाठी घरातील आद्रता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अधिक आद्रता आणि बॅक्टेरिया फंगसच्या वाढीला उपयुक्त ठरतो. घरातील आद्रता साधारण 30 ते 40 टक्के असावी. त्यामुळे हा व्हायरस निर्माण होत नाही. पाण्याच्या टाकीतही येलो फंगची वाढ होण्याची शक्यता असते, असं सूत्रांनी सांगितलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button