breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपुणे
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्रीचा 81 वा वाढदिवस साजरा
बारामती – लोकसभा निवडणुकीची धामधूम, उमेदवाराचे प्रचार, मेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि विविध सभांमधून वेळातवेळ काढून राष्ट्रवादीे काॅंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्वतःच्या आई आशाताई पवार यांचा 81 वा वाढदिवस पवार कुटूंबियांनी एकत्रित येत साजरा केला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मातोश्री म्हणजेच आशाताई पवार यांचा सोमवारी 81 वाढदिवस संपूर्ण पवार कुटुंबीयांनी एकत्रित येऊन साजरा केला. यानिमित्त बारामतीत पवार कुटुंबीयांच्या तीन पिढ्या एकत्र आल्याचे दिसून आल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार शर्मिला पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार पवार कुटुंबातील नातू असं संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते.
अजित पवारांच्या वडिलांच्या निधनानंतर आशाताई पवारांनीच सर्व मुलांना धीराने सांभाळलं आणि उत्तम संस्कार दिलेत. सर्व सण उत्सव एकत्र येवून साजरे करण्याची पवार कुटुंबीयांची वेगळपण आहे. तसेच दिवाळीलाही पवार कुटुंबीय बारामतीत एकत्र येतात.