breaking-newsराष्ट्रिय

गळा कापल्यानंतर डोकं ठेचून केलं ठार, उत्तर प्रदेशात महिला पोलीस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशात ४२ वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून खळबळ माजली आहे. २८ मे च्या रात्री सरकारी निवासस्थानी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रिना कुमारी गुत्पचर विभागात कार्यरत होत्या.

रिना कुमारी गेल्या अडीच वर्षांपासून बरेली पोलीस लाइनमधील सरकारी निवासस्थानी राहत होत्या. हत्येच्या दोन दिवस आधी त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं होतं. आरोपीने रिना कुमारी यांची अत्यंत निदर्यीपणे हत्या करत गळा कापला आणि नंतर डोकं ठेचलं.

घटनास्थळी सामान अस्तव्यस्त पडलं होतं. आरोपी रिना कुमारी यांचा मोबाइल घेऊन फरार झाले आहेत. रिना कुमारी यांच्या घराची खिडकी उघडी असल्याचं दिसल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना शंका आली. त्यांनी रिना कुमारी यांना खिडकीतून आवाज देऊनही उत्तर न आल्याने ते घरात गेले. यावेळी रिना कुमारी यांचा मृतदेह खाली जमिनीवर पडलेला त्यांना दिसला.

चोरीच्या उद्देशाने रिना कुमारी यांची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहेत. तसंच पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने जावा यासाठी जाणुनबुजून सामान खाली फेकलं असावं अशीही शंका आहे. हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button