ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायुसेनेत निवड झालेल्या आदिती कटारे हिचा सोहम ग्रंथालयाच्या वतीने सत्कार

पिंपरी चिंचवड | शाहुनगर येथील आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत निवड झाली आहे. संत तुकाराम नगर येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने नुकताच आदितीचा सन्मान करण्यात आला. नगरसेविका सुजाता पलांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी किरणा सुवर्णा व्यापारी संघ अध्यक्ष कल्याण कटारे, मंजुषा कटारे, आदितीचे आई वडील, सुरेश पवार केंद्र संचालक, वर्षा बोरसे, ग्रंथपाल निर्मला नेरकर, सुमन नेरकर व विद्यार्थी उपस्थित होते.

‘संत तुकारामनगरमधील एकमेव सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका अत्यंत मार्गदर्शक व महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या अभ्यासिकेचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून देशाच्या व प्रशासकीय सेवेत असेच अधिकारी घडावेत’, असे यावेळी स्थानिक नगरसेविका सुजाता पलांडे म्हणाल्या.‘विद्यार्थ्यांने ठरविले तर कोणतेही क्षेत्र अवघड नसते. फक्त त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असावी लागते. मुलींना तिनही सैन्य दलात खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. सोहम अभ्यासिकेतून यापूर्वी 15 ते 16 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत निवडून गेले आहेत. लवकरच मिलिटरी सर्व्हिसेसमधील संधी याबाबत मार्गदर्शन व पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध होणार आहेत’, असे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी केले, सूत्रसंचलन प्रदीप बोरसे यांनी तर, वर्षा बोरसे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button