breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात आमदाराच्या मुलगा, सून, नातवाला कोरोनाची लागण

इचलकरंजी : कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विद्यमान आमदाराचा मुलगा, सून, नातवासह नोकराला कोरोना संसर्ग झाला. आमदाराच्या घरातच चौघे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. चौघांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, इचलकरंजी शहरात काल दिवसभरात सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 60 वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा 4 वर गेला आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इचलकरंजी शहरात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील 25 टक्के भाग हा कंटेन्मेंट झोन झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button