breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘२०२४ च्या निवडणुकीपुर्वी POK ताब्यात घेऊन दाखवा, संपूर्ण देश भाजपाला मतदान करेल’; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये जम्मू-काश्मीरबाबत काही महत्वाच्या घोषणा करताना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पीओकेमधील एक सफरचंद तरी आणून दाखवावं, असं आव्हान अधीर रंजन चौधरी यांनी दिलं आहे.

अधीर रंजन चौधरी म्हणाले, पीओकेमधून किमान एक सफरचंद तर आणून दाखवा. मग सांगा की हो आम्ही करून दाखवलंय. पीओकेमधून चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार होत आहे. याबाबत मोदी आणि अमित शाह का मौन बाळगून आहेत. जी-७, जी-२०, शांघाई समिटमध्ये मोदी जातात, तिथे प्रयत्न का केले जात नाही. पीओके पाकिस्तानच्या कब्जातून सोडवून आणून दाखवा.

हेही वाचा  –  U19 Asia Cup 2023 : या दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना! 

जे काम काँग्रेस करू शकली नाही, ते काम करून दाखवा. तिथून किमान एक सफरचंद तरी आणून दाखवा. येथे मोठमोठी बहादुरी दाखवा. लडाखमध्ये अतिक्रमण झालं आहे. गलवानची घटना सर्वांना माहीत आहे. तेव्हा पंतप्रधान काय करत होते. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, दम असेल, हिंमत असेल तर बहादुरीच्या बाता मारणाऱ्या दोन्ही बहादुरांनी जाऊन पाकिस्तानच्या कब्ज्यातून पीओके खेचून भारताच्या कब्जात आणावा. कारण ते सभागृहात बोलून गेले आहेत. १९९३ मध्य याबाबत सर्वपक्षीय ठरावरही संमत करण्यात आला होता. आता निवडणुका २०२४ मध्ये आहेत. निवडणुकांपूर्वी पीओके खेचून आणा, सर्व देशातील मतं भाजपाला मिळतील, असा टोला अधीर रंजन चौधरी यांनी भाजपाला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button