breaking-newsपुणे

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार संपन्न

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

लॉक डाऊनचे पालन करीत रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धती आणि अध्यापनाची तंत्रे’ या विषयावर ऑनलाईन पध्दतीने  वेबिनार संपन्न झाले.

रयत शिक्षण संस्थेचे, आझाद एज्युकेशन कॉलेज, सातारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून आझाद कॉलजच्या सन्माननीय प्राचार्या डॉ. वंदना जाधव/नलावडे यांनी मार्गदर्शन केले. संशोधक अभ्यासकांना मार्गदर्शन करताना त्यांनी अध्ययन-अध्यापन पद्धती म्हणजे काय ? तसेच अध्ययन अध्यापनाच्या पद्धतीमधील नव्या बदलांचाही परिचय करून दिला. अध्ययन-अध्यापन पद्धतीचे महत्त्व सांगून प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थी केंद्री अध्यापन पद्धती आणि शाखानिहाय अध्यापन पद्धती यांचे  स्वरुप आणि महत्त्व सांगितले. काळानुरूप बदलणाऱ्या अध्यापन तंत्राची माहिती दिली. ॲक्टिविटी बेस लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ट लर्निंग, प्रॉब्लेम बेस्ट लर्निंग, ब्रेन बेस लर्निंग अशा वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचे महत्व त्यांनी यावेळी सांगितले. जर आपण या सर्व अध्यापन पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास चांगल्याप्रकारे होऊ शकेल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या काळानुरूप संशोधक अभ्यासकांना आणि प्राध्यापकांना विद्यार्थीकेंद्री अध्यापनाची तंत्रे माहिती व्हावीत अशा उद्देशाने  एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी पुस्तकांबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानाचाही चांगला उपयोग करायला पाहिजे. पुस्तकांबरोबर विविध ॲपच्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवायला पाहिजे. जर आपण बदलत्या काळानुसार विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत केला तरच आपण समृद्ध आणि ज्ञानी विद्यार्थी घडवू असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. एक दिवसीय राष्ट्रीय बेबिनासाठी महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातील 202 संशोधक अभ्यासकांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे आणि उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाने एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न झाले.

राष्ट्रीय वेबिनारचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख आय.क्यू.ए.सी. विभागप्रमुख डॉ.सविता पाटील/कोठावळे यांनी करून दिली. तर आभार बी.व्होक. विभागप्रमुख प्रा. स्नेहल रेडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button