breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द

पिंपरी: आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा निर्णय आप राज्य प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी घेतला आहे.

गेली दहा वर्षे चेतन बेंद्रे आप मध्ये कार्यरत आहेत. शहरातील विविध नागरी समस्या, श्रमिक जनतेचे प्रश्न तसेच विविध पातळीवर त्यांनी लोकाभिमुख आंदोलने केली आहेत. आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यलयातून विविध नागरी सुविधा, शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवण्याचे काम गेली काही वर्षे ते निगडी, आकुर्डी भागात करत आहेत.

उच्च विद्याविभूषित व आयटी इंजिनिअर असलेल्या चेतन बेंद्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि पुन्हा तातडीने निलंबन मागे घेतल्याने चेतन बेंद्रे यांच्यावरील कारवाईचा पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button