breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, ट्रम्पही सत्ता हस्तांतरणाला तयार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी आज वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटॉल इमारतीत प्रचंड हिंसाचार केला. या हिंसाचारात चारजणांचा मृत्यू झाला. त्यातच, दुसरीकडे अमेरिकन काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली.तर, डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत.

वाचा :-अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; गोळीबारात महिलेचा मृत्यू

अमेरिकेत आज इलेक्टोरेल कॉलेजची मतमोजणी होती. या मतमोजणीत अडथळे आणण्यासाठी ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणला. पण अखेर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवडयांच्या आता सत्तेचे हस्तांतरण होईल असे ट्रम्प यांनी सांगितले. सत्ता हस्तांतरणासाठी ट्रम्प तयार झाले असले तरी निवडणुकीचा निकाल मान्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

वाचा :-फेसबुक, ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई

अमेरिकेत आज लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारी घटना घडली. भावी राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच मोठया संख्येने ट्रम्प समर्थक राजधानी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीवर धडकले. कॅपिटॉल इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सभागृह आहे. इथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. कॅपिटॉल इमारतीत झालेला हा हिंसाचार ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱ्यांना पटलेला नाही. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button