पिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार : आरोपी अटकेत

पिंपरी l प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केला. कोर्टात लग्न करण्याचे ठरलेले असताना लग्न न करता महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 9 जानेवारी 2022 रोजी लोढा बेलमोन्डो सोसायटी रावेत येथे घडला.

इंद्रनील आलोक बोस (वय 29, रा. उंड्री पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 17 एप्रिल 2022 रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर याबाबत महिलेच्या घरच्यांना सांगण्याची धमकी दिली. फिर्यादीला आरोपीने त्याच्या घरी बोलावून 1 ते 14 एप्रिल या कालावधीत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन कोर्टात लग्न करण्याचे ठरवले. फिर्यादीच्या बहिणीने आरोपीच्या मनाप्रमाणे दिलेल्या वस्तू आरोपीने स्वतःकडे ठेऊन घेत फिर्यादीसोबत लग्न न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button