breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आषाढी एकादशी निमित्त एक लाख तुळशीच्या रोपांचे वाटप

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – आरोग्यासोबत पर्यावरणाचे सुद्धा रक्षण व्हावे, तसेच नागरिकांना झाडे लावण्याची व जगवण्याची आवड निर्माण करण्यासाठी या उद्दिष्टाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या वतीने आषाढी एकादशीचे निमित्त साधून शुक्रवार (दि१२) रोजी शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, मंदिरा सह शहरातील विविध भागात तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे अधिकृत प्रतिनिधी शेखर शिंदे, ब प्रभाग अध्यक्ष करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, गजानन चिंचवडे, सचिन शिवले, किरण आहेर, युवराज शामराव वाल्हेकर, सुहास भेगडे, पल्लवी चिंचवडे, कल्पना चिंचवडे, ललिता चिंचवडे, अलका शिवले, इंदूबाई भोंडवे, अंजली चिंचवडे, पद्मावती चिंचवडे, पूनम चिंचवडे आदी या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, या वेळी एक लाख तुळशीची रोपे वाटप करण्यात आले. निसर्ग जपणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे, प्रत्येकाने आपल्या परीने निसर्गाची सेवा करायला हवी. याच भावनेतून सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. झाडे लावून ती जगविण्याची आवड निर्माण होत नाही, तोपर्यंत नागरिकांना पर्यावरणाचे मूल्य समजणार नाही, असे मत उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी व्यक्त केले.

पर्यावरण हे आपल्यासाठी एक वरदानच असून मानवांचे आरोग्य व स्वास्थ्य टिकविण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी एक लाख नागरिकांना तुळशी रोपांचे वाटप शाळा, महाविद्यालय, विविध मंदिर परिसर, गणेश मंडळे आदी ठिकाणी शहरभर करण्यात आले. या निमित्ताने थोडयाफार प्रमाणात का होईना सर्वांची ‘हरित’ आषाढी एकादशी साजरी व्हावी अशी अपेक्षा उपमहापौरांनी व्यक्त केली.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल

उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या एक लाख तुळशीच्या रोपांचे वाटपाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून त्यांचे अधिकृत प्रतिनिधी शेखर शिंदे म्हणाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुळशी रोपांचे वाटप देशभरात प्रथमच करण्यात आल्याने याची दखल वर्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून या उपक्रमाची नोंद रेकॉर्ड मध्ये लवकरच होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button