breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे शिष्यवृत्ती परिषदेचे आयोजन

पिंपरी (महा ई न्यूज) – शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य व केंद्र शासनाकडून विविध शिष्यवृत्ती देण्यात येतात. पण गेल्या चार साडेचार वर्षात विविध वर्गातील विद्यार्थी हे सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे वंचित राहत आहेत. अशांना न्याय  मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शिष्य़वृ्त्ती परिषद भरविण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी दिली आहे.
एकीकडे वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल चे वाढते दर, पडलेला शेती मालाचा भाव, यामुळे विद्यार्थी वर्गांच्या पालकाला आपल्या पाल्याचे शिक्षण करणे अवघड होत असताना दुसऱ्या बाजूला विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहत असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शिकणे अशक्य झाले आहे. यासाठीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर तर्फे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये जावून शिष्यवृत्ती संदर्भात अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना १ ऑक्टोबर पासून ६ ऑक्टोबर पर्यंत  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची माहिती जमा करून त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रयत्न करणार अाहे.
या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन  जाहिर शिष्यवृत्ती परिषदेचे आयोजन ७ ऑक्टोबर रोजी  करण्यात येणार आहे. तरी शिष्यवृत्ती संदर्भात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसशी संपर्क साधण्याचे आवाहन शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button