मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ
पिंपरी l प्रतिनिधी
विवाहितेला मुलबाळ होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. तिच्या नोकरीच्या पगाराच्या पैशांवरून तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिला मारहाण केली. हा प्रकार मे 2018 पासून 17 एप्रिल 2022 या कालावधीत शेवगाव येथे घडला असून विवाहितेने माहेरी येऊन निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पती बाबासाहेब मोहन बनसोडे (वय 32), सासू, आजी सासू, नणंद, सासरे मोहन पांडुरंग बनसोडे, दीर मनोज मोहन बनसोडे, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करुंत यांना नोकरीच्या पगारातील पैशाच्या कारणावरून तसेच वडिलांकडून पैसे आणण्याच्या कारणावरून व दागिने घेण्यावरून त्रास दिला. विवाहितेला मुलबाळ होत नसल्याने तिला घालूनपाडून बोलून अपमानित करत मारहाण व शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.