breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात भररस्त्यात महिला पोलिसाचा विनयभंग, आरोपी अटकेत

पुणे –  सिग्नल तोडून निघालेल्या तरूणाला जाब विचारल्याने त्याने भर रस्त्यात शिवीगाळ आणि असतील हावभाव करत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोलेदिना रस्त्यावर बुधवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

मकसूद बाबु शेख (वय 32, इक्बाल मजिद समोर कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिला पोलीस हवालदाराने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या मोलेदिना रस्त्यावरील महेश लंच समोर थांबल्या होत्या. यावेळी आरोपी ममसूद हा पाठीमागून दुचाकी घेऊन आला. सिग्नल तोडून जात असताना त्याने फिर्यादी यांना धक्का दिला. फिर्यादीने धक्काका मारला याचा जाब विचारला असता त्याने गाडी बाजूला घेतली आणि तू मला विचारणार कोण असे म्हणत त्याच्यासोबत वाद घातला. इतकेच नाही तर त्याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि मारण्यासाठी अंगावर धावून गेला.

बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटकही केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button