breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | पालघरमध्ये आणखी एक बळी, जिल्ह्यात कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू

पालघर | पालघरमधील बोईसर येथील करोना बाधित असलेल्या एका तरुणाचा ठाणे येथे मृत्यू झाला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोना आजारामुळे मृतांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे. बोईसर येथील दलाल टॉवर येथे वास्तव्यास असणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला मुंबई येथे उपचाराकरिता प्रवासादरम्यान करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना प्रथम ठाणे येथील जिल्हा शल्य रुग्णालयात व नंतर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

गेले काही दिवस ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती जिल्हा हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. त्यांचा अंत झाला. पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे आजवर 17 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 367 वर पोहचली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांमुळे प्रशासकीय यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button