breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

… तर ‘फेकूचंद’ पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते – सामना

मुंबईः राज्यातील दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली असून, अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच विरोधकांनी विधानसभेबाहेर आंदोलन केले होते. यातच सर्वांचे लक्ष वेधले ते भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी.  धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं.

आता गोपीचंद पडळकर यांच्या या आंदोलनावर शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. अग्रलेखात पडळकरांचा उल्लेख ‘फेकूचंद’ असा करण्यात आला आहे. तसेच या अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यात हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते.

वाचाः पालकांची मानमानी अन् शिक्षकांची मनधरणी, यात शाळा मालकांवर आर्थिक ‘आणीबाणी’

पडळकर यांच्यावर टीका करत अग्रलेखात म्हटले आहे की, विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच.

दरम्यान, ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकुमशाही प्रवृत्तीची भीती वीटत नाही. अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधुर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला, असे म्हणत अग्रलेखातून भाजपवर देखील सडकून टीका करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button