breaking-newsराष्ट्रिय
निवृत्तिवेतन मिळण्यासाठी आधारची सक्ती नाही- जितेंद्र सिंह
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
स्वयंसेवी संस्थांच्या तिसाव्या बैठकीत त्यांनी सांगितले, की बँकेस भेट न देता जिवंत असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक अतिरिक्त सुविधा म्हणून आधारचा वापर केला जावा अशी अपेक्षा आहे, पण आधार कार्ड अनिवार्य नाही. बँक खात्याला आधार जोडलेले नसल्यामुळे अनेक वृद्धांना निवृत्तिवेतन मिळत नाही अशी तक्रार असून, या बाबत आता मंत्र्यांनीच खुलासा केल्याने संभ्रम दूर झाला आहे. किमान निवृत्तिवेतन मर्यादा आता ९००० रुपये करण्यात आली आहे, तर अंशदान हे २० लाखांपर्यंत ठेवले आहे. वैद्यकीय भत्ता महिना १००० रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली.