breaking-newsपिंपरी / चिंचवड

सहहृदयी विकास साने यांची ‘लोकोत्तर’ सामाजिक बांधिलकी!

कोरोनाविरुद्ध लढाई : अन्नधान्य, औषध वाटपासह जनजागृतीवरही भर

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरात सामाजिक बांधिलकी जपणारा लोकोत्तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून विकास साने यांची ओळख आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना परिस्थितीतही साने यांनी गरजवंतंसाठी सहहृदयी होवून मदतीला धाव घेतली. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो…या भावनेतून केलेल्या विविध उपक्रमांचे परिसरातील नागरिकांकडून कौतूक होत आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र आणि राज्य सरकारने अगदी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण लॉकडाउन केले होते. दोन- अडीच महिने नोकरी, व्यवसाय आणि उद्योग बंद असल्यानु चाकरमानी, कष्टकरी आणि रोजंदारीवर काम करण्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोनवेळच्या जेवनासह सुरक्षा-साधणे आणि औषध उपलब्ध होण्यापर्यंत कष्टकऱ्यांना मदतीची गरज भासू लागली.

       दरम्यान, चिखली परिसरातील सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी पुढाकार घेतले. गरजवंत नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. अत्यावशक सेवेमध्ये काम करणाऱ्या परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कीट देण्यात आले.

अर्सेनिक अल्बम- 30 औषधाचे वाटप…

परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्सेनिक अल्बम-30 हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध वाटप करण्यात आले. तसेच, हे औषध कसे घ्यावे…याबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे. परिसरातील गरजू नागरिकांना मास्कवाटप उपक्रमही घेण्यात आला. विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि वैयक्तिक शिस्त याबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button