breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उर्वरित थकीत वेतन 30 जूनपर्यंत द्या, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितांचे आदेश

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी ते स्वारगेट पर्यंत महामेट्रोची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. या कामात एचसीसी अल्फा इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीकडे मेट्रो स्टेशन बांधणीची कामे आहेत. परंतू, सध्यस्थिती मेट्रोस्टेशनची कामे बंद आहेत. तसेच शेकडो कामगारांचा पगारही कंपनीने दिलेला नाही. याबाबत कामगारांनी मेट्रो कार्यालयावर आज (शुक्रवारी) मोर्चा काढला, कामगारांचे वेतन देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी 30 जूनपर्यंत कामगारांचे उर्वरित थकीत वेतन देण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. 

 एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट या मेट्रो स्टेशनची उभारणी करणा-या कंपनीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील ८० टक्के तर महाराष्ट्रातील २० टक्के असे सुमारे १०० कामगार कर्मचारी काम करतात. डिसेंबर २०१८ पासून त्यांचे वेतन देण्यात आले नव्हते. यातील काही कर्मचा-यांना एक महिना दोन महिन्यांचे वेतन देऊन त्यांना कामावरुन काढण्यात आले होते. कामगारांनी वारंवार कंपनी व मेट्रोकडे वेतनांची मागणी केली असता त्यांनी हात वर केले होते. महामेट्रो रेल प्रोजेक्टचे ठेकेदार अफ्रा इन्फ्राप्रोजेक्टच्या वल्लभनगर येथील कार्यालयासमोर आपल्या हक्काच्या वेतनासाठी १ मे कामगार दिनापासून कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले होते. ३ मे रोजी कामगारांचे वेतनाची काही रक्कम देण्यात आली होती. व १७ मे व ३१ मे २०१९ अशी दोन टप्प्यात कामगारांच्या वेतनाची रक्कम लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण सोडले होते. मात्र कंपनीने शब्द न पाळल्यामुळे १ जून २०१९ रोजी १४ कामगारांनी उपोषण आंदोलन सुरु केले होते.

सबंधीत या आंदोलनाची ठेकेदार, मेट्रो, प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे सबंधीत ठेकदार, मेट्रोचे अधिकारी यांच्यावर आथिर्क अफरातफर,विश्वासघात, फसवणूक बाबत पिंपरी पोलिसस्टेशन चिचवड स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. तसेच दि.०७ जून मेट्रो कार्यालय फुगेवाडी व १० जून कामगार आयुक्त कार्यालय स्वारगेट येथे धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

दापोडी येथे पिंपरी सुरु असणा-या मेट्रो प्रकल्पाच्या स्थळी जाऊन तेथील कामगारांना या फसवणुकीबाबत जनजागृती पत्रके वाटप करुन जनजागृती करण्यात आली. दुपारी ४ वाजता महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित फुगेवाडी कार्यालयात आल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही ४:३० ला कार्यालयात गेलो त्यावेळी दिक्षितांची अधिकारी व ठेकेदारांबरोबर बैठक सुरु होती. वारंवार विनंती करुन देखील ४:३० ते सायं.६:३० पर्यंत आम्हाला दिक्षितांनी भेट दिली नाही. त्यामुळे आम्ही थेट बैठकीच्या हॉलमध्ये घुसून दिक्षितांना जाब विचारला. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली.

त्यावर आमची व दिक्षितांची खडाजंगी झाली. दिक्षितांनी सदरची बैठक बरखास्त करुन त्यांनी आमच्याबरोबर दुस-या हॉलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक  प्रशांत कुलकर्णी, कार्यकारी संचालक गौतम बिर्हाडे, अति. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक  रणजित कुमार तर एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर अनिल बिराजदार, मयुर आसवानी तर कामगारांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, अभिजीत भास्करे, विनोद भालेराव, प्रभाकर माने, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण कुमार, अरुण गायकवाड, तुकाराम जोगी, पवन बिराजदार आदि उपस्थित होते. त्यामध्ये पुढील प्रमाणे निर्णय झाले.

१)    उपोषण करणा-या १४ कामगारांची संपूर्ण वेतन थकबाकी दि.०६/०६/२०१९ रोजी देण्यात यावी.

२)    उपोषण करणा-या कामगारांना पाठिंबा देणा-या १६ कामगारांना एक महिन्याच्या अर्धे वेतन देण्यात आले व ३ कामगारांना एक महिन्याचे पूर्ण वेतन देण्यात यावे.

३)    वरील १६ कामगारांना उरलेला अर्धे थकीत वेतन २० जून २०१९ रोजी दिले जाईल.

४)    श्री. दिक्षित साहेबांच्या आदेशानुसार एच सी सी अफ्रा जेवी कंपनीने सर्व कामगारांचे थकीत वेनाबाबतची संपूर्ण तपशील/यादी महामेट्रोला २० जून २०१९ रोजी सादर करावी.

५)    महामेट्रोच्या व्यवस्थापकिय संचालक श्री ब्रिजेश दिक्षित यांनी एच सी सी अफ्रा जेवी कंपनीने सर्व कामगारांचे संपूर्ण थकीत वेतन ३० जून २०१९ पर्यंत अदा करावे असे आदेश दिले.

६)    ज्या कामगारांनी या कंपनीत काम केले आहे परंतू त्याचे वेतन थकीत आहे आणि कंपनी रेकॉर्ड नुसार दिल्याचे दिसून येत नाही अशा कामगारांचे वेतन हि अदा केले जाईल.

७)    आज दि.०६/०६/२०१९ रोजी आमच्या मागण्या अंशत: पूर्ण झाल्यामुळे सध्या सुरु असलेले उपोषण आंदोलन कामगारांकडून स्थगित करण्यात येत आहे.

अशा अशायाचे पत्र आम्हाला कंपनीने दिले. त्याचबरोबर आजपर्यंत ३ टप्प्यात रोख व धनादेशाव्दारे कामगारांचे आत्तापर्यंत र.रु. ८८ लाख रुपये कामगारांचे वेतन वाटले असून अजूनही अंदाजे र.रु. ७५ लाख रुपये कामगारांचे वेतन कंपनीला देणे आहे. सदरची रक्कम पी.एफ. इनकंमटॅक्स रक्कम धरुन आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षितांच्या आदेशानुसार २० जून रोजी अर्धा पगार देणाचा निर्णय कंपनी व्यवस्थापकांने करावा. तसेच ३० जूनला सर्व कामगारांचे उर्वरित थकीत वेतन कंपनीने अदा करावे. असे आम्ही महामेट्रो व कंपनी व्यवस्थापकाला निक्षुन सांगितले. व आमच्या या मागण्या अंशत: पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन तापुरते स्थगित करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button