breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणे

अभाविपने केली पुणे विद्यापीठात तोडफोड, वाचा नेमके काय कारण…

पुणे – पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केले. विद्यापीठात अश्‍लील रॅप गाण्याचे चित्रीकरण झाले असून त्यावर कुलगुरूंनी कारवाई केली नाही, असा आरोप अभाविपने केला आहे. विशेष म्हणजे आंदोलकांनी विद्यापीठाची तोडफोड केल्याचेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका रॅप गाण्याचे चित्रीकरण झाले होते. आज त्याच खुर्चीवर कुलगुरू बसले आहेत याची आम्हाला लाज वाटते. कुलगुरूंनी कारवाई करायला हवी होती, तेव्हा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दीक्षांत समारंभ अजून झालेला नाही. 70 दिवस उलटून गेले तरी विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेवर झालेली नाही.

आम्ही तोडफोड केली नाही, आम्ही घटनात्मक पद्धतीने आंदोलन केल्याचे अभाविपने म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात सभा सुरू असलेल्या सभागृहातील दरवाजाची काच तुटलेली असून, त्याची काचही सभागृहात पडताना दिसत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी अभाविपने सोमवारी विद्यापीठात ठिय्या मांडून धरणे आंदोलन केले. 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा पदवीप्रदान समारंभ न झाल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रवेश प्रलंबित आहेत. प्रलंबित परीक्षेच्या निकालांमध्ये तसेच जाहीर झालेल्या निकालांमध्येही चुका आहेत. खाशाबा जाधव क्रीडा संकुल सुरू होऊनही क्रीडा विद्यार्थ्यांना त्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. B.Sc-B.Ed च्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेचा लाभ मिळावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button