breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक

अबूधाबी | टीम ऑनलाइन
मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार अबू बकर याला संयुक्त अरब अमिरातीत अटक करण्यात आली आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी अबू बकर तब्बल २९ वर्षांनी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला आहे. त्याला आता भारतात आणले जाणार आहे.

१९९३ साली मुंबईत १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २५७ नागरिक ठार झाले, तर ७०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांनी हे साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. त्यात अबू बकरचाही सहभाग होता. तो दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. मुस्तफा डोसासोबत तो दाऊदसाठी तस्करी करत होता. आखाती देशातून सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तो मुंबईत तस्करी करत होता.

मुंबई बॉम्ब स्फोटासाठी आणलेल्या आरडीएक्सच्या तस्करीतही त्याचा सहभाग होता. १९९७ मध्ये त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याने दुबईतील इराणी मुलीशी लग्न केले आहे. त्याचे दुबईतील अनेक व्यवसायिकांशी हितसंबंध आहेत. त्याला भारतात आणण्याचे तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button