breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची डॉक्टरांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी 
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे अशी माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी  बोलताना दिली आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला निमोनिया झाल्याने ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणंही जाणवली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्या कोरोनातून बऱ्याही झाल्या. त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांनी  दिलेल्या ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीवर, त्या उपचारांना कसा प्रतिसाद देत आहेत यावर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे. असं डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं आहे.

27 जानेवारीला त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती समोर आली होती. तेव्हा त्या उपचारांना प्रतिसाद देत होत्या आणि त्यांची प्रकृती चांगली होती असं डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगतिलं होतं. त्यांना आणल्या दिवसापासून ICU मध्येच ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना आराम मिळावा म्हणून डॉक्टरांची एक टीम सातत्याने प्रयत्न करत आहे.

त्याआधी 23 जानेवारीलाही कुणीही लता मंगेशकर यांच्याबाबत अफवा पसरवू नये. त्यांची प्रकृती चांगली आहे असं ट्विट करण्यात आलं होतं. तसंच त्या लवकरात लवकर घरी परताव्यात, त्यांना आराम मिळावा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत असंही डॉक्टरांनी म्हटलं होतं. मात्र आज त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

2019 मध्येही लतादीदींना निमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल 28 दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button