breaking-newsआंतरराष्टीय

‘फिफा’मध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता : अमेरिका

वॉशिंग्टन : रशियात सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आपल्या नागरिकांना अमेरिकी सरकारने संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. संभाव्य हल्ल्याचा विचार करून अमेरिकी नागरिकांनी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रशियात जाण्याचा पुनर्विचार करावा, असा सल्लाही अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिला आहे. याबाबत ईएफई या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्तरावरील आयोजनादरम्यान दहशतवाद्यांची नजर असू शकते’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सुरक्षा व्यवस्था चोख असेल, परंतु दहशतवादी स्टेडियम, फुटबॉल चाहते, पर्यटन स्थळे, आणि गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात’, असे परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. दहशतवादी कोणतीही धमकी न देता महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतात, असेही परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.

या व्यतिरिक्त पाकिस्तान, क्यूबा, तुर्कस्थान, होण्दुरास या देशांमध्येही दहशतवादी हल्ल्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. याबरोबरच रशियात असलेल्या अमेरिकी नागरिकांशी दुर्व्यवहार, तसेच त्यांचे शोषण देखील केले जाण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button