ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कोरोना मृत्यांच्या नातेवाईकांचे अर्थिक मदतीचे 640 अर्ज नामंजूर; कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा

पिंपरी चिंचवड |  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. या कालावधी अनेक नागगरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. घरातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना सावरण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने 50 हजार रुपयांची अर्थिक मदत घोषित करण्यात आली. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेकडे याबाबतच्या आलेल्या अर्जांपैकी 640 अर्ज बाद झाले असल्याचे समोर आले आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा प्रशासनाने केला.

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या निकटतम नातेवाईकांस 50 हजार रुपये इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे होते. पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत यासाठी 6 हजार 59 मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 640 जणांचे अर्ज बाद झाले असल्याचे समोर आले आहे.

नातेवाईकांना अर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या जाचक अटी ठेवल्या नव्हत्या. मात्र तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात अथवा रुग्णालयाच्या बाहेर झाला असला. तरी ही मदत देण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचे निदान झाल्यानंतर एखाद्या व्यक्तिने आत्महत्या केली असली तरी मदत केली जाणार आहे. मात्र अर्ज करत असताना कागदपत्रांमध्ये झालेली चूक व आधार कार्ड नंबर चुकल्याने अर्ज बाद झाले असल्याची शक्‍यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने स्वतःचा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा स्वतःच बॅंक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, मृत्यू प्रमाणपत्र व इतर नातेवाईकाचे नाहरकत असल्याचे स्वंय घोषणापत्र देणे बंधनकारक होते. यावरून मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कोरोनाने मृत्यू पावलेल्या डेटा उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी जुळवला जातो. आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येते. मात्र तसे झाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे हे अर्ज संगणकीय प्रमाणपत्रावर पाठविण्यात येतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button