breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus:कोरोनावर उपचार घेत असलेली महिला रुग्णालयातून पळाली

मुंबई : कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाहीय. एकीकडे वारंवार सांगूनही लोकं सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीयत. तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे गंभीर वास्तव वारंवार समोर येत आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कसा कमी करायचा ? हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबईतील एका रुग्णालयातून एक गंभीर प्रकार समोर आला. कोरोनावर उपचार घेत असलेल्या महिलेने आपल्या पतीसह रुग्णालयातून पळ गाठल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या महिलेने मुंबईतून चक्क रायगडमधील आपल्या गावी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे. सोमय्या रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.तेवढ्यात संधी साधून ही महिला तेथून बाहेर पडली आणि नवऱ्याला घेऊन ती महाडमधील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या करमर या आपल्या गावी पोहोचली. ३५ वर्षे वयाची ही महिला गर्भवती असून दोघेही मोटारसायकलवरून गावी आल्याची माहिती समोर आली आहे. तिच्याकडील कागदपत्र तपासली असता ती कोविड पॉझिटीव्ह असल्याची बाब आरोग्य यंत्रणेच्या लक्षात आली.

तिच्या पतीच्या अहवालाबाबत अद्याप संभ्रम आहे . आता दोघा पतीपत्नीना महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार प्रशासनाने गांभीर्याने घेतला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button