breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मोरया गोसावी मंदिरात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आरती संपन्न

पिंपरी |

राज्य शासनाने सर्व भक्ती स्थळे खुली करण्याची परवानगी दिली असली तरी नागरिकांनी नियमाचे उल्लंघन न करता शासनाने दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे तसेच सुचनांचे पालन करा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. राज्य शासनाने आज सर्व धार्मिक स्थळे करोना विषयक नियमांचे पालन करुन खुली करण्यास परवानगी दिलेली आहे. त्या निमित्तने चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरामध्ये महापौरांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, स्विकृत सदस्य मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक आप्पा बागल, गजानन चिंचवडे, राजु दुर्गे, उर्मिला काळभोर, वारकरी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष विजु अण्णा जगताप, सामाजिक कार्यकर्ते तानाजी काळभोर, आतिष बारणे, योगेश चिंचवडे, उज्वला गावडे, कुंदा भिसे, महावीर महाराज सुर्यवंशी, उध्दवबुवा कोळपकर, रामलिंग महाराज मोहिते, विजय भोडवे, ह.भ.प. माऊली आढाव, शेखर चिंचवडे आदी उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, शासनाने सर्व भक्ती स्थळे खुली करण्याची परवानगी दिली असल्यामुळे सगळीकडे आनंदमय वातावरण तयार झाले आहे. पंरंतु करोना वाढणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहीजे. दर्शन घेताना सुरक्षित अंतर ठेवा. सॅनिटाय़झरचा वापर करा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा. शासनाने दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे तसेच सुचनांचे पालन करा, असेही त्या म्हणाल्या. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, करोना हि जैविक महामारी होती. त्य़ामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते ते सुरळित व्हावे ही मागणी भगवंताकडे करुया. असे ते म्हणाले, आभार तानाजी काळभोर यांनी मानले. सुत्रसंचलन आप्पा बागल यांनी केले. तसेच सांगवी येथील गजानन महाराज मंदिरामध्येही आज सकाळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसदस्य संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे, दिलिप तनपुरे, संतोष ढोरे, जवाहर ढोरे, सोनम गोसावी, दर्शना कुभांरकर, धनंजय ढोरे, आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button