breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून हेल्पलाईन चालविणा-या शालेय विद्यार्थ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास आजपासून सुरुवात झाली. प्रशिक्षण शिबिरात विविध शाळांच्या निवडक विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी होते.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी ख्रिस्टोफर झेवियर, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, उपअभियंता वैशाली ननावरे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहे. संभाव्य तिस-या लाटेला सामोर जात असताना विविध पातळीवर महापालिका पूर्वतयारी करीत आहे. तिस-या लाटेमध्ये लहान मुले कोरोनाच्या संसर्गामध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक सजगतेने महापालिकेने पूर्वतयारी सुरु केली आहे. कोरोना संदर्भात विविध माहिती तसेच प्रश्नांची उत्तरे सुलभतेने लहान मुलांना मिळावीत यासाठी महापालिकेच्या वतीने चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. चाईल्ड हेल्पलाईनचा मुख्य हेतू लहान मुलांमधील कोरोनाबाबतची भीती दूर करणे हा आहे. हेल्पलाईनचे वैशिष्ट्य म्हणजे ही हेल्पलाईन शालेय विद्यार्थ्यांकडून चालविली जाईल. यासाठी महापालिका हद्दीतील विविध शाळांमधील इयता ७ वी ते १० वी मधील काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थांना चाईल्ड हेल्पलाईन संदर्भात तसेच कोरोना आजाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरे द्यावीत याबाबात प्रशिक्षणात माहिती देण्यात आली.

महापालिकेमार्फत चाईल्ड हेल्पलाईनच्या अनुषंगाने प्रश्नावली तयार करण्यात आली असून हेल्पलाईन चालविणा-या शालेय विद्यार्थ्यांना कोरोना आजार व उपचार याबाबत सविस्तर प्रशिक्षण व माहिती दिली जात आहे. या हेल्पलाईनमध्ये वैद्यकीय अधिका-यांचे सहाय्य देखील राहणार आहे. शिवाय शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन देखील घेतले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button