Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रिपाइंकडून नगरसेवक आेव्हाळांच्या राजीनाम्याची मागणी ; पण शिस्तभंग कारवाई कानाडोळा

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून रिपाइंच्या जागेवर आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक बाळासाहेब आेव्हाळ यांनी देशातील विविध प्रश्नावर भाजपावर आरोप करुन त्यांच्यापासून अलिप्त राहणार असल्याची घोषणा मंगळवारी केली. परंतू, नगरसेवक आेव्हाळ यांचा रिपाइं आठवले गटाशी काडीचा संबंध नाही. ते केवळ निवडणूक लढविण्यासाठी रिपाइंमध्ये आले होते. त्यांना थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे यांनी केली.

महापालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी बाळासाहेब भागवत, के. एम. बुक्तरस, अजीज शेख, लिंबराज कांबळे, विलास कांबळे, अल्ताफ शेख, राजेंद्र कांबळे, एम. पी. कांबळे, अशोक गायकवाड, सिंकदर सूर्यवंशी, केतन कांबळे, अतुल जाधव, रमेश चिमुरकर, लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते.

सोनकांबळे म्हणाल्या,  नगरसेवक बाळासाहेब आेव्हाळ यांचा रिपाइं पक्षाशी कसलाही संबंध नाही. ते पक्षाच्या कुठल्याही पदावर नाहीत. तसेच सक्रीय कार्यकर्तेही नाहीत. महापालिका निवडणूकीत  ते आरपीआयमध्ये आले होते. त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांना तिकीट दिले होते. परंतू, सत्ताधारी भाजप अत्याचारी, जातीयवादी पक्ष असल्याचे त्यांना एक वर्षात पश्चाताप झाला आहे. नगरसेवक ओव्हाळ यांना भाजपबद्दल तिरस्कार वाटतो. रिपाइंच्या नावाखाली स्टंटबाजी करून समाजासाठी काही वेगळे करत असल्याचे त्यांनी दाखवू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button