breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव सादर

मुंबई – मुंबईतील आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असून मुंबई पालिकेतील सत्तापक्ष उदासीन आहे, असा आरोप करत नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची चर्चा करण्यासाठी महापौरांनी त्वरीत प्रत्यक्ष बैठक लावावी अशी विनंती भाजपने पत्राद्वारे केली आहे.

“भोजन से कफन तक” आशा नावाखाली महापालिकेत भ्रष्टाचार सुरु आहे. याला वाचा फुटू नये म्हणून महापौरांनी मागच्या 6 महिन्यात एकही बैठक घेतली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेही बैठक घेतली नाही, असंही प्रभाकर शिंदे म्हणाले.

सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांनी हातात हात घालून भ्रष्टाचार केला. आमची बांधिलकी मुंबईकरांसोबत आहे. वाटण्यात आलेल्या खिचडीचा दर 40 रुपये होता. NGO चा दर 15 रुपये होता. प्रेताच्या कव्हर बॅग पालिकेने 6700 रुपयांना विकल्या. आम्ही पत्र पाठवली, आंदोलने देखील केली. मुंबईतील कोरोना रुग्ण लुटीच्या उंबरठ्यावर आहे. आम्ही नेहमी यावर संघर्ष करत राहिलो, पण महापौरांनी एकही बैठक घेतली नाही. 36 ह अन्वये मुंबई महापौरांवर अविश्वास ठराव दाखल केला आहे. स्थायी समितीची सभा लावली असताना महापौरांनी ती रद्द केली, असा हल्लाबोल प्रभाकर शिंदे यांनी केला.

मुंबईचा कोरोना संसर्ग दर भारतात सगळ्यात जास्त आहे. CPD डिपार्टमेंट मधून झालेली खरेदीही चढ्या दराने झालेली आहे. ही सगळी कंत्राटं एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्यात आली. अर्थसंकल्पात शिवसेनेला जास्त वाटा देण्यात आला आणि भाजपला कमी देण्यात आला, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button