Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

नवी दिल्ली येथील संसदेच्या नवीन इमारतीवर भारताची राजमुद्रा असलेल्या अशोक स्तंभाची भव्य प्रतिकृती स्तंभ; ही आहेत वैशिष्ट्ये

खुलताबाद | नवी दिल्ली येथील संसदेच्या नवीन इमारतीवर भारताची राजमुद्रा असलेल्या अशोक स्तंभाची भव्य प्रतिकृती खुलताबाद येथील शिल्पकार सुनील देवरे व सुशील देवरे यांच्या देवरे अँड असोसिएशनने टाटा प्रोजेक्ट लिमिटेडच्या माध्यमातून साकारली आहे. साडेनऊ मीटर उंचीची ही प्रतिकृती ब्राँझमध्ये घडविण्यात आली आहे. या अशोक स्तंभाचे शिल्पकार सुनील देवरे आणि सुशील देवरे यांचे या शिल्पासाठी कौतुक होत असून खुलताबादकर म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या स्तंभाचे डिझाइन धनश्री काळे यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी प्रस्तावित नव्या संसद भवनाच्या छतावर उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभाचे अनावरण केले. या वेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी उपस्थित होते. खुलताबाद येथील रहिवासी असलेल्या शिल्पकार सुनील देवरे आणि सुशील देवरे म्हणाले, ‘सेंट्रल व्हिस्टाच्या इमारतीसमोर अशोक स्तंभ राजमुद्रा शिल्पाचे काम टाटा ग्रुपमार्फत देवरे अँड असोसिएट यांना मिळाले. यासाठी प्रथम मातीची व थर्माकोलची प्रतिकृती तयार करण्यात आली. औरंगाबाद येथील ‘एमजीएम’च्या यशवंत ग्राफिक्समधील डिझायनर सुशील देवरे यांनी कम्प्युटर ग्राफिक्सच्या साह्याने तिचे अंतिम रूप निश्चित केले. त्यानंतर ‘क्ले मॉडेल’ तयार केले. संसदेच्या पथकाने देवरे यांच्या स्टुडिओत भेट देऊन ‘क्ले मॉडेल’ची पाहणी केली; तसेच त्यामध्ये अपेक्षित बदल सुचवून मॉडेलला मंजुरी दिली. त्यानंतर फायबरचे शिल्प तयार करण्यात आले. औरंगाबाद येथे धातूचे एकसंघ शिल्प घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या भट्ट्या नसल्याने फायबरचे शिल्पाचे लहान लहान भाग तयार करून जयपूरच्या शिल्पित स्टुडिओत ब्राँझमधील एकसंघ शिल्प साकारण्यात आले.

वैशिष्ट्ये-

– सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत संसदेची नवीन इमारत बांधण्यात येत आहे.

– नव्या इमारतीच्या आतील भागात तीन राष्ट्रीय चिन्हे आहेत. यात कमळ, मोर आणि वटवृक्ष यांचा समावेश आहे.

– त्याच्या माथ्यावर साडेसहा मीटर उंच पितळी अशोकस्तंभ बांधण्यात आला आहे. ही प्रतिकृती साडेनऊ मीटर उंच असून, ब्राँझमध्ये घडविण्यात आली आहे. सहा हजार ५०० किलो वजनाच्या ओट्यावर उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे वजन ९५ हजार किलो आहे, तर व्यास ३.३ ते ४.३ मीटर आहे.

नवी दिल्ली येथील संसदेच्या नवीन इमारतीवर अशोक स्तंभ राजमुद्रेची प्रतिकृती दिमाखात उभी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले. खरोखरच हा क्षण गौरवाचा व अभिमानाचा आहे.

– सुनील देवरे, शिल्पकार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button