Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

Maharashtra Monsoon Alert : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू, मुंबईला ऑरेंज तर ५ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

मुंबई : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा आहे. मुंबईतील उपनगरांत रात्रीपासून पाऊस सुरू आहे तर पालघरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पालघरमध्ये भूस्खलन होऊन अनेक लोक अडकल्याची बातमी आहे. वसई परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. इथे घरांचे नुकसान झाले असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

दोन दिवस ‘रेड अलर्ट’
येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबईत भरती-ओहोटीचा इशारा
हवामान खात्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसानंतर मुंबईत हाय टायड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात जूनपासून अतिवृष्टीमुळे ८० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला असून समुद्रकिनारी जाण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे.

नागपुरात स्कॉर्पिओला प्रवाहात वाहिली, तीन ठार, तीन बेपत्ता

नागपुरात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता आहेत. सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. या घटनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून एनडीआरएफकडूनही मदत घेतली जात आहे.

संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट

उत्तर कोकण- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा – दक्षिण कोकण आणि गोव्यातही १३ ते १५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र – उत्तर मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून यामुळे सर्वत्र पाऊस कोसळेल.

दक्षिण मध्य महाराष्ट्र – हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जुलैपर्यंत तुफान पावसाचा इशारा दिला आहे.

मराठवाडा – १३ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका आहे.

पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ – मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात १३ ते १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button