breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय’; प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे गद्दार आहेत. गद्दार तर गद्दारच राहणार.., अशा शब्दात त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन एका प्रसंगात त्यांचा हात दाखवतात. त्यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं. असंच वाक्य श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय, ‘मेरा बाप गद्दार हैं.’

हेही वाचा     –      राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात शिरूर तालुक्यात गावठी दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांनी या सभेपूर्वी एएनआयशी बातचीत केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील रहिवासी चीनी लोकांसारखे दिसतात, असं वक्तव्य काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.

यावर प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, मी सॅम पित्रोदांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मुळात पित्रोदा हे काही काँग्रेसच्या जाहिरनामा समितीचे सदस्य नाहीत, तसेच ते काँग्रेसचे स्टार प्रचारक देखील नाहीत. ते आपल्या देशात राहतही नाहीत. १९६९ पासून ते परदेशातच राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आपल्या देशातील निवडणूक काळात महत्त्वाचा मुद्दा बनवणं दुर्दैवी आहे. देशात सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. महिलांवरील अत्याचार वाढलेत. देशातील मागासलेला वर्ग भाजपाच्या सरकारकडून अपेक्षा बाळगून होता. ‘अच्छे दिन’ येतील असं काहींना वाटत होतं. परंतु, ते काही झालं नाही. देशातला भ्रष्टाचार वाढलाय. शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. हे मुद्दे सोडून आपले पंतप्रधान सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर बोलत बसले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button