Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय, रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी लावणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. तसेच थेट कोकण विदर्भ जोडणारी नागपूर मडगाव ट्रेन गणेशोत्सव कालावधीत सुरू होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होणार आहे.

या आधी काही वर्षापूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत चिपळूणपर्यंत पनवेल ते चिपळूण अशी डेमू ट्रेन चालवण्यात आली होती. मात्र, रोहयाच्या पुढे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन प्रथमच धावणार आहे.

या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०११५७ / ०११५८ ही रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी दि.१९ ऑगस्ट २०२२ ते २१ ऑगस्ट २०२२, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२, १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही मेमू स्पेशल ट्रेन रोहा येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल.

कोकण रेल्वेमार्गावर रोह्याच्या पुढे मेमू स्पेशल ट्रेन प्रथमच चालवली जाणार आहे. या मेमू स्पेशलला माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे तसेच खेड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. चिपळूणपर्यंत धावणारी ही पहिलीच मेमू स्पेशल ट्रेन आठ डब्यांची असणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button