TOP Newsताज्या घडामोडीपुणे

गोदामाच्या पायरीवर दारू पिण्यास मनाई केल्याने टोळक्याकडून व्यावसायिकावर हल्ला

गोदामाच्या पायरीवर दारू पिण्यास मनाई केल्याने टोळक्याने एका व्यावसायिकावर हल्ला करुन दहशत माजविल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन धनकवडे असे जखमी व्यवसायिकाचे नाव आहे.

शमशुद्दीन नजीर जंबुवाले (वय ३८, रा. थोरात काॅलनी, कर्वेनगर), शंकर भारत बिरामणे (वय २५), आकाश रामलू चव्हाण (वय १९), मिथून भरत बिरामणे (वय २६, तिघे रा. अष्टविनायक नगर, साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार, धनकवडी), साहील दीपक पाटील (वय १८, रा. नवनाथनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सचिन धनकवडे (वय ३६, रा. पाटीलनगर, आंबेगाव पठार, धनकवडी) जखमी झाले आहेत. धनकवडे यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आंबेगाव पठार परिसरात धनकवडे यांचे गोदाम आहे. आरोपी गोदामाच्या पायरीवर रात्री दारू प्यायला बसले होते. त्यावेळी धनकवडे यांनी दिवाळीच्या दिवशी दारू पिऊ नका, असे सांगितले. त्यानंतर टोळक्यातील एकाने धनकवडे यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली.
त्यानंतर टोळक्याने कोयता उगारुन दहशत माजविली. धनकवडे यांच्या इमारतीतील भाडेकरू रतननलाल जोशी यांच्या टेम्पोची तोडफोड केली. डाॅ. विनोद जोशी यांच्या वाहनाचे काच फोडली. धनकवडे यांची बहीण आणि मोठ्या भावाला शिवीगाळ करुन दहशत माजविली. पसार झालेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button