breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: धुळ्यात कोरोना संशयितांचे २१ अहवाल नकारात्मक

जिल्हा रुग्णालय प्रशासनाला बुधवारी दुपारी प्राप्त झालेल्या २३ करोना तपासणी अहवालांपैकी दोन अहवाल सकारात्मक, तर २१ नकारात्मक आले आहेत. यात शिरपूर येथील करोना बाधित बस चालकाच्या आई-वडिलांचा समावेश असल्याने शिरपूरमधील रुग्ण संख्या १४ झाली आहे.

जिल्ह्यात दररोज करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दोन महिन्यांपासून संपूर्ण टाळेबंदीमुळे रोजगार, व्यवसाय बंद ठेवून लोकांना शारीरिक अंतर पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही जिल्ह्य़ात करोनाची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धुळे शहरात सर्वाधिक रुग्ण संख्या झाली आहे. मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त अहवालात गल्ली नंबर चार मधील एक महिला करोना बाधित आढळून आली. बाधित मनपा कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ती महिला असल्याचे समजते. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला २३ अहवाल प्राप्त झाले. यात उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथील दोन जणांचे अहवाल सकारात्मक आले.

शिरपूर शहरातील पाटीलवाडा येथील बस चालकाचे ७१ वर्षांचे वडील आणि ६९ वर्षांची आई यांना करोनाची लागण झाली. हे दोन्हीही रुग्ण शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. धुळे तालुक्यातील रतनपुडा, वडेल येथील १६ जणांचे, धुळे शहरातील तिघांचे आणि दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील दोन संशयित रुग्णांचे असे एकूण २१ अहवाल नकारात्मक आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १२० वर पोहचली आहे. त्यात सर्वाधिक ८५ रुग्ण धुळे शहरातील, तर ३५ रुग्ण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत.

शिरपूर तालुक्यात एकूण १४ रुग्ण संख्या झाली आहे. त्यातील सहा जणांवर उपचार सुरू असून तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button