TOP Newsताज्या घडामोडीपुणे

वसंत मोरे आणि रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा आले एकत्र

आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या रूपाली पाटील ठोंबरेआणि मनसेचे वसंत मोरे पुन्हा एकदा एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं. भाऊबीज साजरी करण्यासाठी हे दोघे एकत्र आले होते. रुपाली पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर रूपाली ठोंबरे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात खटके उडल्याचंही पाहायला मिळालं होतं.

“जे काही बोलणे व्हायचे ते फोनवर व्हायचे आता मात्र दहा महिन्यानंतर भेटण्याचा योग आला, त्याचा आनंद आहे, अशी भावना दोघांनी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि मुलखमैदानी तोफ अशी या दोघांची ओळख होती. राजकीय मतभेदामुळे रूपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पाटील यांचा पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर वसंत मोरे आणि रूपाली पाटील राजकारणाने दुरावले होते. मात्र, भाऊबीजेच्या निमित्ताने हे दोघे नेते एकत्र आले. मनसेत या दोघांनी पंधरा वर्षे म्हणजे सन २००६ ते २०२१ पर्यंत एकत्र काम केले होते.

‘मोठा भाऊ म्हणून मला वसंत मोरे यांनी खूप सांभाळून घेतले. महापालिकेत आम्ही एकत्र काम केले. कमावलेले नाते महत्त्वाचे असते. पक्ष सोडल्यापासून भेेटणे झाले नव्हते. वसंत तात्या मला बोलल्याचा राग होता. भाऊ म्हणून त्याने जे सहकार्य केले ते विसरू शकत नाही. मी राष्ट्रवादीत आनंदी आहे. माझा भाऊ आहे तसा भेटला त्यात आनंद आहे’ अशी रूपाली पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button