breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा दहशत माजवली आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी व्यस्त असताना दुसरीकडे दहशतवादी काश्मीर खोऱ्यात हल्ला करत आहेत. आज गुरुवारी सकाळी श्रीनगरमध्ये पुन्हा चकमक झाली. यामध्ये तीन जवानांनी दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं असल्याची माहिती समोर येत आहे.

काश्मीर झोन पोलिसांच्या माहितीनुसार, “श्रीनगरच्या बाटमालू भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडोतोड प्रत्युत्तर दिलं. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. या ठिकाणी शोध मोहिम अद्यापही सुरु आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button