breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Gitanjali Aiyar : दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

मुंबई : दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. त्या औद्योगिक क्षेत्रातही काही काळ कार्यरत होत्या. त्यांच्या निधनामुळे एक सहृदयी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले.

गीतांजली अय्यर यांनी ३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर वृत्तनिवेदन केले. त्या ७६ वर्षाच्या होत्या. १९७१ साली त्या दूरदर्शनाशी जोडल्या गेल्या. त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना ४ वेळा सर्वेत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा – ‘मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार आहे’; राहुल नार्वेकरांचं सूचक विधान

गीतांजली अय्यर या वृत्तनिवेदनासह आपल्या हेअरस्टाईलसाठी प्रसिद्ध होत्या. तसेच मॉर्डन लुक आणि साडी या वेगळ्या हटक्या कॉम्बिनेशनमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यानंतर गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगातात प्रवेश केला. त्या वर्ल्ड वाईड फंड, CII या संघटनेच्या सल्लागार होत्या. त्या पत्रकारिता जगतातल्या स्टार अँकर होत्या. अय्यर यांनी ‘खानदान’ या मालिकेत देखील काम केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button