युद्धामुळं वितरण व्यवस्था विस्कळीत, पंतप्रधानांनी योग्य वेळेला योग्य आवाहन केलं, नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

Chandrakant Patil : पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शेजारील देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते हैदराबादमध्ये बोलत होते. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सतत युद्ध सुरु आहे, त्यामुळं वितरण व्यवस्था विस्कळीत होत असल्याचे पाटील म्हणाले. युद्ध सुरु झाल्यावर घरगुती गॅसचा साठा वाढवायला सुरुवात झाली, त्यामुळे गोंधळ सुरु झाला. मोदींनी योग्य वेळेला योग्य आवाहन केले आहे. त्याचे पालन करावे असे पाटील म्हणाले.
पुण्यात 54 लाख वाहने, त्यामुळे मेट्रो आणि इतर व्यवस्था वापरावी
पुण्यात 54 लाख वाहने झाली आहेत. त्यामुळे मेट्रो आणि इतर व्यवस्था वापरावी. पुण्यात सव्वा दोन लाख लोकं मेट्रोने प्रवास करत आहेत. पूर्ण काम झाल्यावर 8 लाख लोकं प्रवास करतील. देशाचे चलन, प्रदूषण होण्यापासून वाचवणे गरजेचे आहे असे पंतप्रधान म्हणाले.
सोलापूरमध्ये इंजिनियर कॉलेज सुरु करण्यासाठी अडचण आहे. या कॉलेजच्या परवानगीसाठी AICT ची परवानगी हवी आहे. मुख्यमंत्री आणि मी त्यावर काम करतोय. वेळ पडली तरी दिल्लीत जाऊन मी बसणार असल्याचे पाटील म्हणाले. आत्ता 11 आणि नंतर 180 कोटी रुपये निधी मिळणार आहे.
हेही वाचा – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य’; मंत्री संजय शिरसाट
जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत काही बोलणे उचित नाही
रुपाली चाकणकर यांच्या चौकशीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, देशात काही प्रश्न निर्माण झाल्यावर तपास केला जातो. रुपाली चाकणकर या चौकशीला सामोरे गेल्या आहेत. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत काही बोलणे उचित नाही. आरोपाने काही होत नाही. त्यासाठी पुरावे लागतात. काही राजकीय नेते निष्कर्ष काढत आहे. मात्र त्यासाठी पुरावे द्यावे लागतात असे पाटील म्हणाले. .
कांदा प्रश्नी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सरकारने कांदा आणि इतर शेतमालासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. भावांतर योजना सरकार राबवत आहे. संपूर्ण जगभरातील वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे, त्यामुळे तो निर्यात होत नाही असे पाटील म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची देशवासियांना उद्देशून केलेली नऊ आवाहने
1 पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत
2 खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा
3 पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका
4 वर्षभर परदेशी प्रवास टाळा
5 कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे
6 परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही
7 जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा
8 वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या
9 परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा





