ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाडेकरूंची माहिती लपवणे घरमालकांना पडले महागात!

पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! : शहरात ३८ जणांवर गुन्हे दाखल

​पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यक्ती आणि सुरक्षेच्या कारणास्तव घरमालकांना भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक असतानाही, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. एप्रिल २०२६ मध्ये राबविलेल्या विशेष मोहिमेत माहिती न देणाऱ्या ३८ घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

​’एसीबी’ आणि ‘एटीसी’ची संयुक्त मोहिम

​शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबविण्यात आली. दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि पोलीस स्टेशन स्तरावरील दहशतवाद विरोधी कक्ष (ATC) यांनी आयुक्तालय क्षेत्रात भाडेकरूंची सखोल पडताळणी केली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ नुसार ही माहिती देणे बंधनकारक असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा –  ‘विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

​माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाई – उपायुक्त प्रदीप जाधव

​पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) प्रदीप जाधव यांनी या मोहिमेबाबत माहिती देताना सांगितले की, सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची कागदपत्रे आणि माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देऊन पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. जर माहिती दिली नाही, तर संबंधित घरमालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, परिसरात कोणी संशयित व्यक्ती किंवा अनधिकृत बांगलादेशी नागरिक राहत असल्यास त्याची माहिती चिंचवड येथील दहशतवाद विरोधी शाखेला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कारवाईतील पथक

​ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एटीबी आणि एटीसीच्या पथकाने केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button