Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-PCMC: काळ्या बॅनर्समुळे माजी नगरसेवकांच्या अपयशाची चर्चा

प्रभाग क्रमांक- ८, इंद्रायणी नगर परिसरातील काळे बॅनर बनले चर्चेत

पहाटे झळकले फलक; महापालिकेने केली कारवाई

पिंपरी | नेहमी शांत असलेल्या इंद्रायणीनगर परिसरामध्ये आज सकाळपासूनच झळकलेले काळे फलक चर्चेचा विषय बनले. प्रभाग क्र. ८ मध्ये पहाटेपासून विविध ठिकाणी काळ्या रंगाचे बॅनर्स झळकताना दिसले. या भागातील रखडलेल्या विकास कामांवर या काळ्या फलकांमधून लक्ष वेधण्यात आले. रखडलेली विकास कामे, आधांतरी असलेले विविध प्रकल्प, निधीचा वारेमाप खर्च असा आशय या फलकांमधून झळकत होता. एक प्रकारे माजी नगरसेवकांच्या अपयशाची चर्चा या फलकांमधून होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे होते.

पिंपरी चिंचवडमध्ये 2017 मध्ये भाजपची एक हाती सत्ता होती. त्यानंतर प्रशासकीय राजवट लागू झाली. मात्र या राजवटीतही भाजपचेच आजी माजी पदाधिकारी नगरसेवकाच्या अविर्भावात वावरत होते. प्रत्येक कामावर वारेमाप खर्च, सल्लागारांवर उधळपट्टी मनमानी पद्धतीने ठेकेदारांची मर्जी सांभाळणे. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर एक प्रकारे डल्ला मारण्यात आला. या सर्व कारभाराचे कारनामे प्रभाग क्रमांक आठ मध्ये काळ्या फलकातून समोर आले. त्यामुळे इंद्रायणी नगर प्रभाग क्रमांक 8 मधील हे काळे फलक आज शहरभर चर्चेचा विषय बनले.

हेही वाचा     :          टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर; शुबमन गिल संघाबाहेर 

या बॅनर्सवर थेट कोणाचंही नाव नसले तरी, त्यातील मजकूर आणि आशयातून सध्याच्या माजी नगरसेवकांच्या कार्यकाळातील अपयशावर स्पष्टपणे बोट दाखवण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. विशेषतः 2017 च्या पंचवार्षिक च मुदत संपल्यानंतर लागलेल्या प्रशासकीय काळातही नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्या भाजप नगरसेवकांचा पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वाहतूक आणि मूलभूत सुविधांमध्ये अपयश या बॅनर्सच्या माध्यमातून सूचित केले गेले असल्याचे बोलले जात आहे.

फलकांनी दिली बदलाची चाहूल..

स्थानिक नागरिकांच्या मते, प्रभागात झळकलेले काळे फलक हे भाजपच्या अपयशाचे प्रतीक असून, जनतेच्या नाराजीचे प्रतीकात्मक रूप आहे. अनेक नागरिकांनी स्वतःहून चर्चा करत “हे आपल्याच अनुभवांचं प्रतिबिंब आहे” असे मत व्यक्त केले. या बॅनर्समागे नेमकं कोण आहे, याबाबत अधिकृत माहिती नाही, तरी सध्याच्या राजकीय वातावरणात हे बदलाची चाहूल म्हणून पाहिले जात आहे. महानगरपालिकेने या घटनेची तातडीने दखल घेत संबंधित काळे बॅनर्स हटवले. दरम्यान या काळ्या बॅनर्समुळे प्रभाग क्र. ८ मध्ये राजकीय वातावरण तापल्याचे स्पष्ट दिसत आहे,. आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button