Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर; शुबमन गिल संघाबाहेर

T20 WC 2026 | आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते. आता सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात मैदानात उतरणार आहे.

दरम्यान शनिवारी (२० डिसेंबर) बीसीसीआय कडून या स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. या संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. संघातून शुबमन गिल याला वगळण्यात आले असून, त्यामागे खराब फॉर्म आणि दुखापत ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

या बदलांमुळे संजू सॅमसन टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. तसेच रिंकू सिंग याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार कामगिरी करणाऱ्या इशान किशन यालाही दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळलेला जितेश शर्मा याला यावेळी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).

हेही वाचा           :          पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!

भारतीय संघाचे साखळी सामने

७ फेब्रुवारी: भारत विरुद्ध अमेरिका – मुंबई
१२ फेब्रुवारी: भारत विरुद्ध नामिबिया – दिल्ली
१५ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
१८ फेब्रुवारी: भारत विरुद्ध नेदरलँड – अहमदाबाद

स्पर्धेतील गट रचना

अ गट: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया
ब गट: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान
क गट: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
ड गट: न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button