‘राजमाता जिजाऊ’ महाविद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकणार!
शिक्षण विश्व : महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघात 3 खेळाडुंचा समावेश

पुणे : नाशिक येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा 19 वर्षाखालील मुलांचा संघ निवडण्यात आला असून, त्यामध्ये पुणे येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी भोसरी येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयातील कु. महेक नबीलाल मुल्ला (11वी वाणिज्य), कु. आदित्य नितीन कापरे (12वी वाणिज्य) आणि कु. संतोष नरेंद्र चव्हाण (11वी वाणिज्य) यांची डिसेंबर महिन्यात हरियाणातील रोहतक येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्रातील मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, अमरावती, लातूर, नाशिक, नागपूर आणि पुणे या आठ विभागातून आलेल्या संघांमधून करण्यात आली.
हेही वाचा – प्रतिभा सृजन व्याख्यानमाला 2025 : चिंचवड येथे “चला उभारू नवी पिढी” चा संकल्प
सदर खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे आणि प्रशिक्षक दत्तात्रय वाळके यांनी विशेष मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष आणि भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले आणि खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार अजित भाऊ, सचिव सुधीर मुंगसे, नगरसेवक व विश्वस्त विक्रम लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी., उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल करणाऱ्यासाठी सज्ज झालेले ‘राजमाता जिजाऊ’चे क्रिकेटपटू महेक, आदित्य आणि संतोष यांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचा हा संघर्ष आणि मेहनत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. राष्ट्रीय स्पर्धेत तुमच्या यशाची आम्ही अपेक्षा करतो.
– विलास लांडे, अध्यक्ष, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ.





