राजमाता जिजाऊ महाविद्यालय संघाला शालेय विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद!
शिक्षण विश्व: 17 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पिंपरी-चिंचवड | आत्मा मलिक क्रीडा संकुल कोकमठाण येथे नुकतीच संपन्न झालेल्या शालेय विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, लांडेवाडी भोसरी यांचा संघ प्रथम क्रमांकावर आढळून विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला. या विजयानंतर संघाला राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
नाणेफेकीनंतर सोलापूर शहर संघाने राजमाता जिजाऊ संघाला 10 ओव्हरमध्ये सात बाद 70 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तर देताना राजमाता जिजाऊ संघाने 9.4 ओव्हरमध्ये 5 बाद करत 71 धावा पूर्ण करून विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा : नवजीवन स्पोर्ट्सच्या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गाजवली बाजी
विजयी संघात तन्मय पाटील, तन्मय माने, स्वराज थरकुडे, ध्रुवील रायता, किरण सुर्वे, विहान बागड, साई गुंजाळ, आदित्य शेंडगे, शौर्य पाटील, सोहम मोहिते, रोनित पोद्दार, अखिलेश पाटील, आर्यन चव्हाण, जय गोंदकर, मुकुंद बाबर, तेजस गिलबिले यांचा समावेश होता. संघाला कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे आणि प्रशिक्षक दत्तात्रेय वाळके यांच्या मार्गदर्शनाचा विशेष लाभ मिळाला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी खेळाडूंना विशेष अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रमदादा लांडे, प्राचार्य डॉ. कानडे के.जी., उपप्राचार्या प्रा. किरण चौधरी, उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस, तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंच्या यशाचे कौतुक केले. या विजयानंतर राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या मेहनतीने आणि समर्पणाने मिळालेल्या या यशामुळे आम्हाला अभिमान वाटतो. राज्यस्तरीय स्पर्धेतही आमचे खेळाडू गुणवत्ता दाखवतील याची मला खात्री आहे. मेहनत, चिकाटी आणि संघभावनेतून आमचे नवोदित खेळाडू आणखी मोठ्या यशाकडे झेप घेतील, असा विश्वास आहे.
– विलास लांडे, अध्यक्ष, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ.





