breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मावळात शिवसेनेचेही शक्ती प्रदर्शन, कर्जत येथे उध्दव ठाकरेंची सभा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातील कर्जत येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा घेण्यात येणार आहे. ही सभा कर्जत येथे गुरूवारी (दि. 1) दुपारी तीन वाजता येथील पोलीस मैदानावर होईल. या सभेत ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे उपस्थित राहणार आहेत. सभेची पूर्वतयारी करण्यासाठी शहरातील शिवसैनिकांची आकुर्डीतील पक्ष कार्यालयात मंगळवारी (दि. 30) दुपारी दोन वाजता बैठक होणार आहेत. पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केले आहे.