ताज्या घडामोडीमुंबई

मंकीपॉक्स आजाराचा संसर्ग नेमका कसा होतो; तज्ज्ञ म्हणतात…

मुंबई |मंकीपॉक्स हा वेगाने फैलावणारा संसर्गजन्य आजार आहे का, यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये संदिग्धता आहे. ज्या देशांमध्ये या संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहेत, तिथे या आजाराचा प्रसार किती वेगाने होत आहे याचा अभ्यास वैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. मंकीपॉक्स या आजाराची लक्षणे दिसू लागल्यापासून पुढील चार आठवडे संसर्गजन्य असतो. पण रुग्णाशी अतिशय निकट संबंध आला किंवा रुग्णाच्या स्त्रावाचा थेट संपर्क झाल्यास हा आजार पसरू शकतो.

लसीका ग्रंथींना येणारी सूज फक्त मंकीपॉक्स या आजारामध्ये आढळते. कांजिण्या तसेच देवीमध्ये अशी सूज येत नाही. हा आजार संसर्गजन्य आहे. आतापर्यंत २२०पेक्षा अधिक निश्चित निदान झालेल्या केस स्पष्ट झाल्या आहेत. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम या देशांतून जास्त रुग्ण नोंदवले गेले असून मृत्यूदर हा एक ते दहा टक्क्यांदरम्यान असल्याचे सांगितले जाते. करोना संसर्गानंतर आता वैद्यकीय संघटना या आजाराबद्दल अधिक गांभीर्याने व जबाबदारीने भाष्य करत असल्याचे सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी सांगितले. या आजारासंदर्भात सुरू असलेल्या वैद्यकीय चर्चामध्ये मंकीपॉक्सपेक्षा भारतात कांजिण्यांची समस्या अधिक गंभीर असल्याचे ते म्हणाले.

लसीकरणासाठी प्राधान्यगट

भारतात या आजाराचे रुग्ण आढळले तर गर्भवती स्त्रिया, रुग्णाचे घरातील नातेवाईक, निकटच्या संपर्कात असलेले रुग्ण यांच्यामध्ये प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. रुग्णांची तपासणी करताना त्यांच्या तोंडावर, तळहात, तळपायावर व्रण असतील तर त्यांची तत्काळ नोंद करणे गरजेचे आहे. समलिंगी संभोग करणाऱ्या व्यक्तीमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा प्राथमिक वैद्यकीय अंदाज वर्तवला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button