पिंपरी / चिंचवड

सोशल मीडियावर गाडी विकण्याची जाहिरात करत 37 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

सोशल मीडियावर गाडी विकण्याची जाहिरात देऊन गाडीचे पैसे अगोदर घेऊन गाडी न देता एका व्यक्तीची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 ऑक्टोबर 2021 ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत प्रेमलोकपार्क, चिंचवड येथे घडली.

सुभाष दत्तात्रय काळे (वय 44, रा. प्रेमलोकपार्क, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जमुना प्रसाद व पुनित किरीत ठक्कर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फेसबुकवर टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी विकायची असल्याची जाहिरात दिली. पुनित ठक्कर याने त्याचे ओळखपत्र, गाडीचे फोटो, गाडीचे कागदपत्र, बँक डिटेल्स पाठवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्याकडून 37 हजार 500 रुपये घेऊन दुचाकी न देता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button