Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

पुणे | राज्यात मान्सून दाखल झाला आहे. सकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता पुढील चार दिवसांत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अविरत जारी केला आहे. यामुळे पुढील चार आठवडे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘मला कॅबिनेट मंत्री करा’; रामदास आठवलेंची मागणी
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी :
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.





