टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज
जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे बाहेर त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका

मुंबई : पाहुण्या इंग्लंडला 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 4-1 ने लोळवल्यानंतर टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा नागपूमधील व्हीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाला या मालिकेआधी मोठा झटका लागला. टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यानंतर आता आणखी एक खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे टीमची डोकेदुखी वाढली आहे.
इंग्लंडचा युवा फलंदाज जेमी स्मिथ याला दुखापतीमुळे टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्याला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. टेलिग्राफ स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जेमी स्मिथला दुखापतीमुळे पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे इंग्लंडसाठी हा मोठा झटका समजला जात आहे. जेमीने अवघ्या काही दिवसांपूर्वी टी 20i पदार्पण केलं होतं. जेमीने 25 जानेवारीला टीम इंडियाविरुद्ध चेन्नईतील सामन्यातून टी 20i क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. जेमीने टीम इंडियाविरुद्धच्या 2 टी 20i सामन्यांमध्ये एकूण 2
हेही वाचा : ‘नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीत ८८ कोटींचा घोटाळा’; अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
आता जेमीच्या जागी कुणाला संधी मिळणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लेग स्पिनर रेहान अहमद याला वनडे सीरिजसाठी भारतात थांबायला सांगितलं आहे. रेहानचा वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात समावेश करण्यात आला नव्हता. रेहान टी 20i मालिकेनंतर मायदेशी परतणार होता. मात्र आता टी 20i मालिकेतील पराभवानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा